बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावतचा जन्म 24 ऑक्टोबर 1976 रोजी हरियाणा येथे झाला होता. जाट कुटुंबात जन्मलेल्या मल्लिकाचे खरे नाव रीमा लांबा असं आहे. रीमाचे कुटुंबीय चित्रपटात काम करण्याच्या विरोधात होते. तिच्या वडिलांना दिल्लीच्या मिरांडा कॉलेजची पदवीधर रीमाला सरकारी अधिकारी बनवायचे होते. पण रिमाचं मन ग्लॅमरस जगात होतं . तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी रीमाने घर सोडलं होतं.
जेव्हा रीमा ग्लॅमरस इंडस्ट्रीचा भाग बनली तेव्हा तिने तिचे नाव बदलून मल्लिका शेरावत ठेवले. रीमाने माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत सांगितल होतं की तिनं आईचं आडनाव शेरावत वापरलं आहे.
मल्लिका शेरावतने तिच्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती.तिला अमिताभ बच्चन, शाहरुख खान यांसारख्या बड्या कलाकारांसोबत टीव्ही अॅडमध्ये काम करण्याची संधी मिळाली होती.
2002 मध्ये फिल्मी दुनियेत नशीब आजमावणाऱ्या मल्लिकाला 'जीना सिरफ मेरे लिए' या चित्रपटात छोटी भूमिका मिळाली होती. पण 2003 च्या 'ख्वाइश' चित्रपटातील मल्लिकाच्या सीन्समुळे ती प्रसिद्धीझोतात आली होती.
मल्लिका शेरावतने तिच्या पुढच्या 'मर्डर' चित्रपटात असे बोल्ड सीन्स दिले होते. की मल्लिकाची चर्चा आंतरराष्ट्रीय स्तरावर होऊ लागली होती.
मल्लिका शेरावतलाही याचा लाभही मिळाला होता. हॉलिवूड चित्रपटात काम करण्याची संधी तिला मिळाली होती. मल्लिकाने जेव्हा जॅकी चॅनसोबत 'मिथ' या चित्रपटात काम केले तेव्हा त्याची जबरदस्त चर्चा झाली होती शिवाय तिला लोकप्रियताही मिळाली होती.
मल्लिका शेरावतने 'हिस', 'डबल धमाल', 'डर्टी पॉलिटिक्स', 'बचके रहना रे बाबा', 'किस किस की किस्मत', 'प्यार के साइड इफेक्ट्स' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केल आहे.
मल्लिका शेरावतच्या अभिनय प्रवासात, तिचे वैयक्तिक आयुष्य, विवाहित, एका मुलाची आई अशा बातम्यांच्या खूप चर्चा झाल्या होत्या. मल्लिकाने माध्यमांना दिलेल्या अनेक मुलाखतींमध्ये सांगितल आहे की तिला एका कठीण टप्प्यातून जावं लागलं आहे.
मल्लिका शेरावतने वेब सीरिजमध्येही काम केल आहे. आजही मल्लिका शेरावतच्या अभिनयापेक्षा तिच्या बोल्डनेसचीच जास्त चर्चा आहे.