सध्या लॉकडाउनमुळे सर्वच बॉलिवूड सेलिब्रेटी घरी आहेत. त्यामुळे बीझी शेड्युची तक्रार करणाऱ्या या सेलिब्रेटींना त्यांचे छंद जोपासायला आयतीच संधी मिळाली आहे. त्यामुळे मलायका या संधीचा पुरेपूर वापर करत आहे.
मलायकाला अभिनया व्यतिरिक्त जेवण बनवण्याची खूप आवड आहे. त्यामुळ सध्या लॉकडाउनच्या काळ ती तिच्या आवडीचे पदार्थ बनवून घालवताना दिसते.
मलायकानं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर काही व्हिडीओ शेअर केले आहेत. ज्यात ती बेसनाचे लाडू बनवताना दिसत आहे.
मलायका तिच्या किचनमध्ये अगदी तुमच्या-आमच्यासारखीच सराइतपणे वावरताना दिसते आहे.
मलायकाचे बेसनाचे लाडू बनवतानाचे हे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप हिट झालेले पाहायला मिळत आहेत.
हे लाडू बनवत असताना मलायकानं तिच्या चाहत्यांना एक मेसेजही दिला आहे. ती म्हणते, 'घरी राहा. सुरक्षित राहा आणि खाण्याचे वेगवेगळे पदार्थ नक्की बनवून पाहा.'
मलायकानं तिच्या इन्स्टाग्रामवर बेसनाच्या लाडूंचा फोटो शेअर केला आहे. ज्यात तिनं तिला हे लाडू बनवण्यासाठी सल्ला देणाऱ्या शेफचेही आभार मानले आहेत. सध्या मलायकाचे हे फोटो सोशल मीडियावर खूप चर्चेत आहेत.