बॉलिवूडची फिटनेस फ्रिक अभिनेत्री,डान्सर, मॉडेल मलायका अरोराने आपला 49 वा वाढदिवस जवळच्या मित्रांसोबत मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये साजरा केला. मलायकाच्या बर्थडे पार्टीला तिचा बॉयफ्रेंड-अभिनेता अर्जुन कपूरसह बेस्ट फ्रेंड करीना कपूर, करिश्मा कपूर, सैफ अली खान, सीमा सजदेह, सोफी चौधरी, महीप कपूर, भावना पांडे, मनीष मल्होत्रा, गुरु रंधावा, आकांक्षा रंजन आणि डिझायनर तनवीर यांनी हजेरी लावली होती.
मलायकाला बॉलिवूडमधील स्टाईल आयकॉन म्हणून ओळखलं जातं. अनेक तरुणी आणि नवोदित नायिका मलायकाची स्टाईल फॉलो करतात. दरम्यान मलायका अरोराने वाढदिवसाच्या पार्टीसाठी पांढऱ्या आणि निळ्या रंगाचा सुंदर आउटफिट निवडला होता. तिने मॅचिंग शूज सनग्लासेस देखील घातले होते.
गर्लफ्रेंड मलायकाच्या बर्थडे पार्टीत अर्जुन कपूर मागे राहील असं कसं होईल. मलायकाच्या बर्थडे पार्टीत अर्जुन कपूरही हँडसम दिसत होता. तो निळ्या रंगाचा डेनिम शर्ट आणि काळ्या पँटमध्ये दिसून आला. मलायकाप्रमाणेच त्यानेही सनग्लासेस कॅरी केला होता.
आपल्या खास मैत्रिणीच्या बर्थडे पार्टीसाठी अभिनेत्री करीना कपूरदेखील अगदी थाटामाटात आली होती. यावेळी करीना कपूरने ब्लॅक ब्रालेट, फ्लेयर्ड जीन्स आणि ब्लॅक ब्लेझर परिधान केला होता. अभिनेत्री फारच स्टाईलिश दिसत होती.
फॅशनच्या बाबतीत करिश्मासुद्धा करीनापेक्षा कमी नाहीय. या पार्टीत करिश्मा कपूर ब्लॅक अँड व्हाइट ड्रेसमध्ये दिसली. दुसरीकडे, सैफ निळ्या रंगाचा शर्ट आणि जीन्समध्ये दिसला. तसेच करिश्मा आणि सैफने एकत्र पोज दिली.
या पार्टीमध्ये आलिया भट्टची बालमैत्रीण आकांक्षा रंजन आणि पंजाबी-बॉलिवूड गायक गुरु रंधावादेखील उपस्थित होते. यावेळी दोघांनी कॅमेऱ्यासाठी पोजदेखील दिली.
मालयकाच्या बर्थडे पार्टीत अभिनेता चंकी पांडेची पत्नी आणि अनन्या पांडेची आई भावना पांडे पांढऱ्या रंगाच्या वेस्टर्न आउटफिटमध्ये सुंदर दिसत होती.
प्रसिद्ध बॉलिवूड फॅशन डिझाईनर मनीष मल्होत्रादेखील मलायका अरोराच्या वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी झाला होता. मलायकाची बहीण अमृता अरोरादेखील उपस्थित होती.