मलायका अरोरा आणि अरबाज खान यांनी मुलगा अरहानचा 17वा वाढदिवस खूप धडाक्यात साजरा केला. हा दिवस खास बनवण्यासाठी या दोघांनीही कोणतीच कसर सोडली नाही.
विशेष म्हणजे अरहानच्या वाढदिवसाला मलायका सोबत अरबाज सुद्धा दिसला.
याशिवाय अरहानच्या बर्थडे पार्टीमध्ये मलायकाची संपूर्ण फॅमिली दिसली. अरहानच्या वाढदिवसाची पार्टी मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात आली होती.
मलायका आणि तिच्या फॅमिली व्यतिरिक्त या पार्टीला काही बॉलिवूड सेलिब्रेटींनीही हजेरी लावली. या पार्टीमध्ये मलायकानं ब्लॅक कलरचा शिमरी ड्रेस परिधान केला होता.
या पार्टीमध्ये मलायकाची बहीण अमृता अरोरा सुद्धा उपस्थित होती.
मलायका तिच्या आईचा हात पकडून तिला हॉटेलमध्ये घेऊन जाताना दिसली.
या पार्टीला अर्जुन कपूर दिसला नसला तरीही त्याच्या काकाची म्हणजेच संजय कपूरची मुलगी शनया मात्र पार्टीमध्ये सहभागी झाली होती.
याशिवाय अभिनेत्री अनन्या पांडे सुद्धा या पार्टीला उपस्थित होती.