'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा शो टीव्हीवरील अतिशय लोकप्रिय शोपैकी एक आहे. या शोच्या माध्यमातून अनेक कलाकार घराघरात पोहोचले आहेत. या कलाकारांचं मानधन किती हे तुम्हाला माहितेय का? आज आपण याबाबतच जाणून घेणार आहोत.
काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुंबईची मुलगी शिवाली परबला एका एपिसोडसाठी 35 ते 37 हजार रुपये दिले जातात.
रसिका वेंगुर्लेकरला या शोमध्ये एका एपिसोडसाठी 25 ते 30 हजार रुपये दिले जातात.
वनिता खरातला एका एपिसोडसाठी 32 ते 35 हजार मानधन देण्यात येतं.
अभिनेत्री नम्रता संभेरावला या कार्यक्रमात एका एपिसोडसाठी 30 ते 37 हजार रुपये दिले जातात.
आपल्या विनोदाच्या अचूक टायमिंगने लोकांना वेड लावणाऱ्या अरुण कदम यांना एका एपिसोडसाठी 30 ते 35 हजार रुपये मानधन दिलं जातं.
अभिनेता प्रसाद खांडेकरला एका एपिसोडसाठी तब्बल 40 ते 50 हजार दिले जातात.
दुसरीकडे अभिनेते समीर चौगुले यांनासुद्धा 40 ते 50 हजार रुपये एका एपिसोडसाठी दिले जातात.
फिल्टरपाड्याचा बच्चन अर्थातच अभिनेता गौरव मोरेला एका एपिसोडसाठी 40 ते 50 हजार रुपये मिळतात.