'महाराष्ट्राची हस्यजत्रा' शोमधून घराघरात पोहोचलेली मराठमोळी अभिनेत्री म्हणजे वनिता खरात होय.
वनिता खरात आपल्या बोल्ड आणि बिनधास्त स्वभासाठी ओळखली जाते.
गेल्यावर्षी वनिताने न्यूड फोटोशूट करत खळबळ माजवून दिली होती. यामध्ये काहींनी अभिनेत्रीचं कौतुक केलं होतं, तर काहींनी तिच्यावर टीका केली होती.
वनिता खरात आता लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे.अभिनेत्रीच्या लग्नाला केवळ 11 दिवस उरले आहेत.
अशातच आता वनिताने आपला होणार पती सुमित लोंढेसोबत प्री वेडिंग फोटोशूट केलं आहे.
वनिताने सुमितसोबत लिपलॉकचा फोटो शेअर करत पुन्हा एकदा इंटरनेटचा पारा वाढवला आहे.
वनिता आणि सुमितच्या या फोटोवर सोशल मीडियावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
नेटकरी तसेच सेलेब्रिटी वनिता आणि सुमितला त्यांच्या लग्नासाठी शुभेच्छा देत आहेत.