'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय विनोदी शो आहे. या शोच्या माध्यमातून अनेक कलाकार जगभरात लोकप्रिय झाले आहेत.
यातीलच एक अभिनेत्री म्हणजे शिवाली परब होय. शिवालीने फारच कमी वेळेत प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे.
मूळची सावंतवाडीची असणारी शिवाली परब सध्या हास्यजत्रेमधून प्रेक्षकांना खळखळून हसवत आहे.
शिवाली परबचा मोठा चाहतावर्ग आहे. तिचे चाहते सतत तिच्या खाजगी आयुष्याबाबत जाणून घ्यायला उत्सुक असतात.
नुकतंच शिवाली परबने आपल्या सर्वात मोठ्या क्रशबाबत सांगितलं आहे.
अभिनेत्रीने सांगितलं की, बॉलिवूड किंग शाहरुख खान त्याचा सर्वात मोठा क्रश आहे. तो आपल्याला प्रचंड आवडत असल्याचं तिने म्हटलं आहे.
आपण इन्स्टावर व्हिडीओ बघतो की, कसं शाहरुख आपल्या चाहत्यांना अचानक येऊन सरप्राईज देतो. त्यामुळे माझं त्याच्यावर खूप मोठं क्रश आहे.