'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय विनोदी शो आहे. या शोमधून अनेक कलाकार लोकप्रिय झाले आहेत.
त्यातीलच एक कलाकार म्हणजे अभिनेता ओंकार राऊत होय. ओंकार सतत चर्चेत असतो.
ओंकारने नुकतंच नवी कोरी कार खरेदी करत चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे.
ओंकारने नव्या कारसोबतचे फोटो शेअर करत सुंदर असं कॅप्शन दिलं आहे.
अभिनेत्याने लिहलय, '24/04/2023 ला नवी baleno घरी आली. अक्षयतृतीयेला गाडी घेता आली नाही पण योगायोगाने सचिन तेंडुलकरच्या वाढदिवसा ला ती घरी आली! (साडे तीन मुहूर्तांपैकी नसला तरी हा ही देवाचाच दिवस! )सचिन च्या average एवढा, तिचं mileage असावं!सचिन च्या runs एवढे, तिचे kilometers व्हावे!सचिनच्या straight drive एवढी smooth तिची drive असावी!''
ओंकारच्या या पोस्टवर त्याला चाहते आणि सेलिब्रेटी शुभेच्छा देत हटके कमेंट्स करत आहेत.
दरम्यान प्रियदर्शनी इंदलकरने कमेंट करत 'कॅप्शन' असं म्हटलंय. अर्थातच तिने ओंकारच्या कॅप्शनचं कौतुक केलंय.
ओंकार राऊत आणि प्रियदर्शनीच्या एका फोटोवरुन त्यांच्या रिलेशनशिपची चर्चा रंगली होती.