बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितवर दुःखच डोंगर कोसळलं आहे.
वडील शंकर दीक्षित यांच्या मृत्यूच्या १० वर्षानंतर अभिनेत्रीच्या आई स्नेहलता दीक्षित यांचं निधन झालं आहे.
माधुरी दीक्षित आपल्या आईसोबत एखाद्या मैत्रिणीसारखी राहात होती.
या दोघींमध्ये फारच छान बॉन्डिंग होतं.
माधुरी सतत आपल्या आईसोबतचे सुंदर फोटो शेअर करत असते,
माधुरी दीक्षितच्या आई तरुणपणी अगदी तिच्यासारख्याच दिसत होत्या.
आईच्या निधनाने माधुरी दीक्षितच्या आयुष्यात कधीही न भरुन निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.
माधुरीच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिच्या आईचे अनेक फोटो पाहायला मिळतात.