बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित आपल्या व्यावसायिक आयुष्यासोबतच आपल्या खाजगी आयुष्यामुळेसुद्धा चर्चेत असते.
माधुरी दीक्षित आणि पती डॉ. श्रीराम नेने यांनी नुकतंच मुंबईमध्ये एक आलिशान घर खरेदी केलं आहे. हे घर वरळी भागात आहे. 5 हजार 500 स्क्वेयर फूट जागेत हे घर स्थित आहे.
डॉ. श्रीराम नेने यांनी प्रति महिना 12.5 लाख इतक्या रक्कमेवर भाडेतत्वावर हे घर खरेदी केलं आहे. माधुरी दीक्षितचं हे घर अपार्टमेंटच्या 29 व्या मजल्यावर आहे.
इंटेरियर डिझायनर अपूर्वा श्रॉफ यांनी माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेने यांच्या नव्या घराचं रिन्युएशन केलं आहे.
अपूर्वा श्रॉफ यांनी अवघ्या 45 दिवसांत जबरदस्त इंटिरियर केलं आहे. यांनी इन्स्टाग्रामवर काही फोटोदेखील शेअर केले आहेत.
या जोडप्याला सुंदर, सुबक आणि साधा मेकओव्हर हवा असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
माधुरी दीक्षितचं हे आलिशान घर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आलं आहे.
माधुरी दीक्षित सध्या आपल्या 'द फेम गेम' या वेबसीरीजमुळे चर्चेत आहे. नुकतंच ही सिरीज रिलीज झाली आहे.