भारतात एकीकडे आरएसएस आणि इतर सामाजिक संघटना लव्ह जिहादला एक गंभीर कट समजत आहात तर देशातील काही सेलिब्रिटींनी यापलीकडे जाऊन लग्न केली आहेत. आज आपण अशाच प्रकारची काही उदाहरणे पाहणार आहोत.
बॉलिवूडमध्ये याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे सुनील दत्त आणि नर्गिस आहेत. इतकेच नाही तर त्यांचा मुलगा संजय दत्त याने देखील एका मुस्लिम महिलेची लग्न केले.मान्यता दत्त नावाने प्रसिद्ध असलेल्या त्याच्या पत्नीचे खरे नाव दिलनवाज शेख आहे.महत्त्वाचे म्हणजे दोन्ही पिता पुत्रांनी प्रेमविवाह केला होता.
कॉग्रेसचे महत्त्वाचे नेते स्वर्गीय राजेश पायलट यांचे पुत्र सचिन पायलट यांनी देखील मुस्लिम महिलेशी लग्न केले आहे. जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांची मुलगी सारा अब्दुल्ला हिच्याबरोबर प्रेमविवाह केला आहे. या दोघांना त्यांच्या विवाहामध्ये दोन्ही कुटुंबियांच्या नाराजीचा सामना करावा लागला होता.
बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टी प्रसिद्ध आर्किटेक्टची मुलगी माना कादरी हिच्याशी विवाह केला आहे. त्यांच्या मुलांची नावे देखील आथिया आणि अहान आहेत. माना यांच्या दोन्ही बहिणींनी देखील हिंदू व्यक्तीशी लग्न केले आहे.पण सुनील आणि माना यांना लग्नासाठी 9 वर्षं वाट पहावी लागली होती.
मुंबईमधील गँगस्टर अरुण गवळी यांनी देखील एका मुस्लिम महिलेशी लग्न केले आहे. त्यांच्या पत्नीचे नाव जुबैदा मुजावर नाव होते.लग्नानंतर त्यांनी नाव बदलत आशा ठेवले होते. या दोघांना पाच मुले असून त्यांची मुलगी गीता मुंबईमधील मोठी राजकारणी आहे.
आदित्य पांचोली याने देखील मुस्लिम महिलेशी विवाह केला आहे. त्यांच्या पत्नीचे नाव जरीना वहाब असून त्यांचे लग्न आणखी एका कारणामुळे चर्चेत आले होते. य दोघाच्या लग्नावेळी त्याच्या वयामध्ये देखील खूप अंतर होते. जरीना या आदित्य यांच्यापेक्षा सहा वर्षांनी मोठ्या असून त्यांचा मुलगा सूरज देखील बॉलिवूडमधील अभिनेता आहे.
एकेकाळी प्रसिद्ध असलेल्या संजय खान यांच्या कुटुंबात देखील लग्नावेळी कोणत्याही प्रकारचा धर्मीय भेदभाव केला जात नाही. त्यांची एक मुलगी सुझान हिने हृतिक रोशन यांच्याबरोबर विवाह केला