एकता कपूरचा (Ekta Kapoor) बहुचर्चित 'लॉकअप' (LockUpp) हा रिअॅलिटी शो प्रचंड चर्चेत होता. काल शोचा ग्रँड फिनाले पार पडला.
'लॉक अप' या रिअॅलिटी शोला पहिल्या सीजनचा विजेता मिळाला आहे. 70 दिवस संघर्ष केल्यानंतर मुनव्वर फारुकी या शोचा विजेता ठरला आहे.
कंगना रणौतच्या या शोमध्ये शेवटच्या टप्प्यात मुनव्वर फारुखी,पायल रोहतगी, अंजली अरोरा, आजमा फलाह आणि शिवम शर्मा हे पाच फायनलिस्ट होते.
मुनव्वर फारुखीने ट्रॉफी जिंकल्यानंतर सर्वांचं लक्ष त्याला मिळविलेल्या बक्षिसाकडे लागलं आहे.
अनेकांना जाणून घ्यायची इच्छा आहे की, लॉकअप सीजन 1 च्या विजेत्याला नेमकं काय बक्षिसात मिळालं.
ट्रॉफीसोबतच मुनव्वरला 20 लाख रुपये रोख आणि नवी कारही देण्यात आली.
इतकंच नव्हे र मुनव्वरला विदेश ट्रीपचं तिकीटसुद्धा देण्यात आलं आहे.
बक्षिसाच्या रूपात मुनव्वरला एर्टिगा आणि इटली ट्रिपचं तिकीटसुद्धा मिळालं आहे.