NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / ‘मला Coronavirus चिडवतात’; बॉलिवूड अभिनेत्रीनं सांगितला धक्कादायक अनुभव

‘मला Coronavirus चिडवतात’; बॉलिवूड अभिनेत्रीनं सांगितला धक्कादायक अनुभव

‘घराबाहेर पडताच लोक कोरोना म्हणत तिच्या मागे लागतात’; अभिनेत्रीनं सांगितला विचित्र अनुभव

16

ओम शांती ओम, रंगून, मेरी कॉम यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये झळकलेली लिन लॅशराम ही बॉलिवूडमधील एक अष्टपैलू अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. (Lin Laishram/Instagram)

26

आपल्या प्रयोगशील अभिनयशैलीद्वारे तिनं सिनेसृष्टीत स्वत:चं असं एक वेगळं स्थान प्रस्थापित केलं आहे. अत्यंत कठीण किंवा चौकटीबाहेरील व्यक्तिरेखा साकारण्यासाठी ती ओळखली जाते. (Lin Laishram/Instagram)

36

मुळची मनिपूर येथील असलेली लिन सध्या कोरोनामुळं त्रस्त आहे. खरं तर देशातील सर्वचजण कोरोनामुळं त्रस्त आहेत. पण लिनच्या बाबतीत मात्र वेगळीच घटना घडत आहे. (Lin Laishram/Instagram)

46

लिन सध्या दिल्ली आहे. ती वर्कआऊट करण्यासाठी जेव्हा घराबाहेर पडते तेव्हा तिला काही टवाळ लोक कोरोनाव्हायरस म्हणून चिडवतात. काही जण तिला चिनी मांजर देखील म्हणतात. (Lin Laishram/Instagram)

56

फ्री प्रेसला दिलेल्या मुलाखतीत लिननं या धक्कादायक अनुभव सांगितला. ती म्हणाली, “ अनेकदा वर्णद्वेषाचा सामना करावा लागतो. लोक मला हल्ली कोरोना व्हायरल म्हणून चिडवतात. या प्रकाराचा मला प्रचंड मानसिक त्रास होतो.” (Lin Laishram/Instagram)

66

सध्या या प्रकरणी तिनं पोलिसांकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे. चिडवणाऱ्या काही तरुणांना पोलिसांनी अटकही केली आहे. परंतु काही लोकांना पकडून ही मानसिकता बदलेल असं लिनला वाटत नाही. (Lin Laishram/Instagram)

  • FIRST PUBLISHED :