कॉमेडियन भारती सिंह (Bharati Singh) हे नाव घराघरात पोहोचलं आहे. भारती सिंह सध्या तिच्या प्रेग्नन्सीमुळे चर्चेत आहे. ती या काळातही टीव्ही शो होस्ट करताना दिसत आहे. त्यामुळे अनेक महिलांसाठी भारतीने आदर्श समोर ठेवला आहे. (फोटो सौजन्य- Instagram/bharti.laughterqueen)
दरम्यान भारतीने नवरा हर्ष लिंबाचियासह रोमँटिक फोटोशूट केलं आहे. प्रेग्नन्सीच्या आठव्या महिन्यात कॉमेडियनने केलेलं हे फोटोशूट चाहत्यांना फार आवडलं आहे. (फोटो सौजन्य- Instagram/bharti.laughterqueen)
नेहमी काहीतरी मजेशीर कृती करणारी भारती यावेळी रोमँटिंक अंदाजात दिसत आहे. हर्षने यावेळी सिंपल लुक कॅरी केला आहे. (फोटो सौजन्य- Instagram/bharti.laughterqueen)
भारतीने इन्स्टाग्रावर शेअर केलेल्या या फोटोंमध्ये ती बेबी बम्प फ्लाँट करताना दिसत आहे. (फोटो सौजन्य- Instagram/bharti.laughterqueen)
या पिंक गाऊनमध्ये भारतीचा फारच सुंदर दिसत आहे. भारतीच्या चाहत्यांनी आणि मनोरंजन इंडस्ट्रीतील कलाकारांनी भारती या लुकमध्ये फारच क्यूट दिसत असल्याच्या कमेंट्स केल्या आहेत. (फोटो सौजन्य- Instagram/bharti.laughterqueen)
हलकासा मेकअप आणि थोडकीच ज्वेलरी यामध्ये भारती गोड दिसत आहे. यावेळी ती लाफ्टरक्वीन अंजाजात नाही तर रोमँटिंक क्वीन अंदाजात दिसत आहे. (फोटो सौजन्य- Instagram/bharti.laughterqueen)
हे कपल सध्या रिअॅलिटी शो हुनरबाजसाठी सध्या शूट करत आहे. याठिकाणीही हर्ष भारतीची विशेष काळजी घेताना दिसतो. भारती प्रेग्नन्सीच्या आठव्या महिन्यातही काम करत असल्याने चाहत्यांकडून तिचं कौतुक होताना दिसतं. (फोटो सौजन्य- Instagram/bharti.laughterqueen)
हर्षसोबतचं फोटोशूट भारतीने होळीदिवशी शेअर करत सर्वांना होळीच्या शुभेच्छा दिल्या होत्या. दरम्यान या ग्रेपकलर गाऊनमध्ये भारती आणखी सुंदर दिसत आहे. यामध्येही तिचा क्यूटनेस कमी झालेला नाही. (फोटो सौजन्य- Instagram/bharti.laughterqueen)
2017 मध्ये हर्ष आणि भारती यांनी लग्न केलं. दरम्यान पहिल्यांदाच आई-बाबा होण्यासाठी हे दोन्ही कलाकार खूप उत्सुक आहेत, अनेकदा त्यांनी तसं म्हटलं आहे. (फोटो सौजन्य- Instagram/bharti.laughterqueen)
भारतीच्या या फोटोंवर तर कमेंट्सचा पाऊस पडला आहे. मनोरंजन विश्वातील तिच्या मित्रपरिवाराने देखील भारतीच्या या लुकचं कौतुक केलं आहे. (फोटो सौजन्य- Instagram/bharti.laughterqueen)
या हेवी गाऊनमध्ये भारती फारच सुंदर दिसते आहे. यामध्ये लाफ्टरक्वीनचा मॉडेल म्हणूनही वेगळा अंदाज पाहिला मिळाला. (फोटो सौजन्य- Instagram/bharti.laughterqueen)