NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Lata Mangeshkar: राजकुमाराच्या प्रेमात पडलेल्या लतादीदी, करायचं होतं लग्न;का अपूर्ण राहीलं स्वप्न?

Lata Mangeshkar: राजकुमाराच्या प्रेमात पडलेल्या लतादीदी, करायचं होतं लग्न;का अपूर्ण राहीलं स्वप्न?

Lata Mangeshkar Untold Stories: गानकोकिळा लता मंगेशकर यांनी आपल्या सुमधुर आवाजाने कोट्यावधी लोकांच्या मनावर राज्य केलं आहे. आजही लोक त्यांची प्रत्येक गाणी तितक्याच आत्मीयतेने ऐकतात आणि त्यांच्या आठवणीत रमतात.

17

गानकोकिळा लता मंगेशकर यांनी आपल्या सुमधुर आवाजाने कोट्यावधी लोकांच्या मनावर राज्य केलं आहे. आजही लोक त्यांची प्रत्येक गाणी तितक्याच आत्मीयतेने ऐकतात आणि त्यांच्या आठवणीत रमतात.

27

लतादीदी आज या जगात नसल्या तरी त्या आपल्या गाण्यांच्या माध्यमातून आजही लोकांना भुरळ पाडत आहेत.

37

लता मंगेशकर यांच्या गायन कारकिर्दीबाबत आणि त्यांच्या खाजगी आयुष्याबाबत सर्वांनाच माहिती आहे. परंतु फारच कमी लोकांना त्यांच्या लव्हस्टोरीबाबत माहिती आहे.

47

अनेकांना असा प्रश्न पडतो की लतादीदी आयुष्यभर अविवाहित का राहिल्या? यामागे भावंडाची जबाबदारी हे एक कारण तर आहेच. पण यामागे आणखी एक कारण असल्याचं सांगितलं जातं.

57

मीडिया रिपोर्ट्सनुसार लतादीदी फक्त एका व्यक्तीच्या प्रेमात पडल्या होत्या. त्यांचं नाव होतं राज सिंह. ते माजी क्रिकेटर आणि क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्षसुद्धा होते. दोघेही एकमेकांना पसंत प्रचंड करत होते. राज सिंह दीदींना 'मिठू' या नावाने बोलावत असत.

67

दोघेही एकमेकांशी लग्न करण्याचा विचार करत होते. मात्र राज सिंह यांच्या वडिलांनी या नात्याला नकार दिला. कारण ते एका राजघराण्यातील होते. आणि त्यांना सुनसुद्धा राजघराण्यातीलच हवी होती. त्यामुळे राज सिंह यांनी कधी आपल्या आईवडिलांच्या शब्दापुढे जाण्याचा प्रयत्न केला नाही. आणि लतादीदीसोबत लग्न करण्याचा विचार त्यांनी मनातून काढून टाकला.

77

अशाप्रकारे पहिल्यांदाच प्रेमात पडलेल्या लतादीदींना नकार पचवाव लागला होता. यांनतर त्यांनी कधीच लग्नाचा विचार केला नाही. त्यांनी आपल्या भावंडांसाठी आपलं आयुष्य खर्ची घातलं.

  • FIRST PUBLISHED :