NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / 'सर्व काही देवाच्या इच्छेने होतं', लता दीदींनी का केलं नाही लग्न? स्वत:चं केला होता खुलासा

'सर्व काही देवाच्या इच्छेने होतं', लता दीदींनी का केलं नाही लग्न? स्वत:चं केला होता खुलासा

लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनी लग्न का केलं नाही? असा प्रश्न अनेकांना पडतो. आयुष्यभर एकटं राहण्याचा निर्णय त्यांनी का घेतला? या प्रश्नांचं उत्तर जवळपास 10 वर्षांपूर्वी स्वत: लता दीदींनी दिलं होतं.

18

गानसम्राज्ञी, भारत रत्न लता मंगेशकर यांनी वयाच्या 92व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. मागील 28 दिवसांपासून त्या मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल होत्या. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. 28 सप्टेंबर 1929 रोजी इंदौरमध्ये एक मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता. पाच भाऊ-बहिणींमध्ये सर्वात मोठ्या असणाऱ्या लता दीदींनी लग्न केलं नाही.

28

लता दीदींच्या आवाजाची जादू जगभरात पसरली. पण आयुष्यभर त्या एकट्याच राहिल्या. लता दीदींनी लग्न का केलं नाही, याचा खुलासा त्यांनी स्वत:चं केला होता.

38

2011 मध्ये लता दीदींनी याबाबतचा खुलासा आपल्या जन्मदिनी केला होता. TOI ला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी सर्व काही देवाच्या इच्छेने होत असल्याचं म्हटलं होतं. आयुष्यात जे काही होतं ते चांगल्यासाठी होतं आणि जे नाही होत, तेदेखील चांगल्यासाठीच होत असल्याचं त्या म्हणाल्या होत्या.

48

जवळपास 10 वर्षांपूर्वी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं, की 'जर हा प्रश्न मला चार-पाच दशकं आधी विचारला असता, तर कदाचित तुम्हाला काही वेगळं उत्तर मिळालं असतं. पण आता माझ्याकडे अशा विचारांसाठी कोणतीही जागा नाही.'

58

मुलाखतीत त्यांना कधी एकटेपणा जाणवला नाही का? असा प्रश्न विचारला होता. यावर लता दीदींनी उत्तर दिलं होतं, 'माझे सर्व मित्र निघून गेले. नर्गिस आणि मीना कुमार माझ्या अतिशय जवळच्या मैत्रिणी होत्या. त्यांच्या निधनापर्यंत आमचं रोज बोलणं होत होतं. देव आनंद माझे जवळचे मित्र तेदेखील गेले, ज्यांच्या संपर्कात मी होते. मित्रांच्या जाण्यानंतर आयुष्यात एकटेपणा जाणवत होता.'

68

लता दीदींनी आणखी एका मुलाखतीत सांगितलं, की घरात त्या सर्वात मोठ्या होत्या, त्यामुळे त्यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या होत्या. अशात अनेकदा लग्नाचा विचार केला, तरी अंमलात आणू शकली नाही.

78

अतिशय कमी वयात लता दीदींनी कामाला सुरुवात केली होती. 1942 मध्ये त्या केवळ 13 वर्षांच्या असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं. अशात कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर आली होती.

88

लता दीदींनी 50 हजारहून अधिक गाणी गायली. त्यांना भारताच्या तीन सर्वोच्च नागरी सन्मानाने (भारत रत्न, पद्म भूषण आणि पद्म विभूषण) तसंच तीन राष्ट्रीय आणि चार फिल्मफेयर पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे.

  • FIRST PUBLISHED :