छोट्या पडद्यावरील मालिका 'कुंडली भाग्य' मधील अभिनेत्री ईशा आनंदने गुपचूप लग्न केलं आहे. तिने हे लग्न गेल्या महिन्यात केल आहे. मात्र आत्ता तिने ही माहिती चाहत्यांना दिली आहे. त्यामुळे सर्वांनाचं सुखद धक्का बसला आहे.
ईशाने आपल्या लग्नाचे फोटो शेयर करत आपला आनंद व्यक्त केला आहे. तसेच आपल्या जोडीदारासाठी देवाचे आभार मानले आहेत.
ईशाने राजस्थानमध्ये फ्लाईग पायलट वासदेव सिंह जसरोटीया सोबत लग्न केलं आहे.
ईशाने आपल्या लग्नाची माहिती गुपित ठेवण्यापाठीमागे कोरोना महामारी हेचं कारण असल्याचं सांगितलं आहे.
ईशाने म्हटलं की तिने 2 फेब्रुवारीलाचं कोर्टात लग्न केलं होतं.
त्यानंतर कोरोना महामारीमुळे छोट्याश्या कौटुंबिक पद्धतीने हा विवाहसोहळा संपन्न झाला होता.
कोरोनामुळे फक्त घरातील लोक आणि काही जवळच्या व्यक्तीच उपस्थित होत्या.
ईशाने सांगितलं कोरोनाचं संकट टळल्यानंतर किंवा लसीकरण झाल्यानंतर लग्नाची पार्टी देऊ इच्छिते.
ईशाच्या फोटोंवर चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
10 मे ला ईशाने पिवळ्या रंगाच्या साडीत एक फोटो शेयर करत, लवकरच गुड न्यूज देणार असल्याचं सांगितलं होतं.
ईशा 'कुंडली भाग्य ' मालिकेत तापसीची व्यक्तिरेखा साकारत आहे. शिवाय 'छोटी सरदारनी' मालिकेतसुद्धा विशेष भूमिकेत दिसून येत आहे.