बॉलिवूड अभिनेता ईशान खट्टरचा आज वाढदिवस आहे. त्याच्याविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊया.
ईशान खट्टर हा बॉलीवूडमधील अशा कलाकारांपैकी एक आहे ज्याने फार कमी वेळात खूप लोकप्रियता मिळवली.
ईशान खट्टर हा प्रसिद्ध अभिनेत्री नीलिमा अजीम आणि राजेश खट्टर यांचा मुलगा आहे.
जान्हवी कपूरसोबत 'धडक' चित्रपटातून ईशान खट्टरने बॉलिवूड पदार्पण केलं होतं. मात्र फार कमी जणांना माहित आहे की, तो लहानपणापासूनच इंडस्ट्रीत काम करत आहे.
'लाइफ हो तो ऐसी' या चित्रपटातून ईशानने बालकलाकार म्हणून करिअरला सुरुवात केली होती. या चित्रपटावेळी तो फक्त 10 वर्षांचा होता.
ईशान पहिल्यांदा शाहिद कपूरच्या लाइफ हो तो ऐसी मध्ये दिसला होता, ज्यामध्ये त्याने शाहिदच्या धाकट्या भावाची भूमिका केली होती. शाहिद कपूर ईशाचा सावत्र भाऊ आहे पण दोघेही एकमेकांच्या खूप जवळ आहेत.
ईशानने तब्बूसोबत नेटफ्लिक्सच्या वेब सीरिज 'अ सुटेबल बॉय'मध्ये दिसला. यामध्ये त्याने त्याच्या दुप्पट वयाच्या तब्बूसोबत किसिंग सीन देऊन खळबळ उडवली होती.
ईशान खट्टर लवकरच कतरिना कैफसोबत फोन भूत या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत सिद्धांत चतुर्वेदीही असणार आहे.