सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांचं नातं आता जगजाहीर झालं आहे. दोघेही पती-पत्नी बनले आहेत. या दोघांच्या लग्नानंतर कियारा आणि सिद्धार्थचं कुटुंबही चर्चेत आलं आहे. आजकाल सर्वाधिक चर्चा आहे ती कियाराची बहीण आणि सिद्धार्थची मेहुणी इशिता अडवाणीची. बॉलिवूडपासून दूर असणारी इशिता स्टाईल आणि सौंदर्याच्या बाबतीत कियाराला पुरेपूर टक्कर देतेय.
कियारा आणि सिद्धार्थच्या लग्नात इशिता अडवाणीने सर्वांचं लक्ष वेधलं होतं. आपल्या ग्लॅमरस अंदाजाने कियाराच्या बहिणीने सर्वांनाच घायाळ केलं आहे.
इशिता ही कियाराची मोठी बहीण आहे. तिचा जन्म 20 नोव्हेंबर 1989 रोजी मुंबईत झाला होता.
मुंबईच्या शासकीय विधी महाविद्यालयातून तिने शिक्षण घेतलं आहे. विशेष म्हणजे ती व्यवसायाने एक वकील आहे.
इशिता आपल्या बहिणीच्या रिसेप्शन पार्टीत पिंक कलरच्या साडीत पोहोचली होती.
या पार्टीनंतर इशिताचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
इशिता प्रसिद्धीपासून नेहमीच दुसरं असली तरी तिला आयुष्यातील प्रत्येक क्षण खास पद्धतीने जगायला आणि पार्टी करायला खूप आवडतं.
इशितानेसुद्धा लव्ह मॅरेज केलं आहे. 2022 मध्ये इशिताने कर्मा विवानसोबत लग्नगाठ बांधली आहे. तोसुद्धा एक वकील आहे.