प्रसिद्ध कोरियोग्राफर आणि रोहित शेट्टी यांच्या 'खतरों के खिलाडी' शोचा विजेता तुषार कालियाच्या चाहत्यांसाठी एक गुड न्यूज आहे.
तुषार कालियाने नुकतीच आपली गर्लफ्रेंड त्रिवेणी बर्मनसोबत लग्नगाठ बांधत सुखद धक्का दिला आहे.
तुषार कालियाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर लग्नाचा एक खास फोटो शेअर करत आपल्या लग्नाची माहिती चाहत्यांना दिली आहे.
ही माहिती समोर येताच तुषार आणि त्रिवेणीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे
तुषार आणि त्रिवेणी या फोटोमध्ये फारच सुंदर दिसत आहेत. त्रिवेणीने लाल रंगाचा लेहंगा परिधान केला आहे. तर तुषारने मोती रंगाची शेरवानी परिधान केली आहे.
तुषार कालियाने 'खतरों के खिलाडी' शोमध्ये जाण्यापूर्वी गर्लफ्रेंड त्रिवेणीसोबत साखरपुडा उरकला होता.
तुषार आणि त्रिवेणीने सोशल मीडियावर आपल्या साखरपुड्याचे फोटो शेअर केले होते.
सध्या त्यांच्या लग्नाचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.