NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / KGF 2: Yash चा बॉडीगार्ड होता केजीएफचा हा भयावह व्हिलन, वाचा 'गरुडा'ची सुपरस्टार बनण्याची कहाणी

KGF 2: Yash चा बॉडीगार्ड होता केजीएफचा हा भयावह व्हिलन, वाचा 'गरुडा'ची सुपरस्टार बनण्याची कहाणी

यश स्टारर केजीएफः चॅप्टर 2 (KGF 2) बॉक्स ऑफिसवर जबरदस्त बिझनेस करत आहे. जगभरात या सिनेमाचे शोज हाऊसफुल्ल जात आहेत. चित्रपटातील मुख्य अभिनेता यशचे तर कौतुक होतच आहे, शिवाय नेगिटिव्ह रोल करणाऱ्या संजय दत्त (Sanjay Dutt) चे, PM ची भूमिका करणारी अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tondon) या कलाकारांचे देखील कौतुक होत आहे. या दरम्यान सिनेमाच्या पहिल्या पार्टच्या व्हिलनची देखील चर्चा होत आहे. ही भूमिका करणाऱ्या अभिनेत्याचे विशेष कौतुक झाले होते.

16

प्रशांत नील (Prashant Neel) चा सिनेमा केजीएफमध्ये भयावह व्हिलन 'गरुडा'ची भूमिका करणाऱ्या रामचंद्र राजू (Ramachandra Raju) चे नाव KGF चॅप्टर 2 च्या प्रदर्शनानंतर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या अभिनेत्याने अभिनयाची सुरुवात केजीएफच्या पहिल्या भागापासूनच केली होती. त्यानंतर त्याने अनेक दाक्षिणात्या सिनेमात काम करत आपला ठसा उमटवला आहे. (Photo Credit - Ramachandra Raju Instagram)

26

केजीएफमध्ये जरी रामचंद्र राजू यशविरोधात काम करताना दाखवला असला तरी खऱ्या आयुष्यात हा अभिनेता एकेकाळी यशचा बॉडीगार्ड होता. आताच्या घडीला हा कधी बॉडीगार्ड असणारी ही व्यक्ती दाक्षिणात्य सिनेमातील सुपरस्टार व्हिलन बनली आहे. (Photo Credit - Ramachandra Raju Instagram)

36

प्रशांत नील यशला केजीएफची स्क्रीप्ट ऐकवण्यासाठी पोहोचले होते, तेव्हा त्यांची नजर अभिनेत्याच्या बॉडीगार्डवर पडली. दिग्दर्शकला रामचंद्र राजूचा लुक एवढा आवडला की त्यांनी त्याच वेळी त्यांना नेगिटिव्ह रोल ऑफर केला. (Photo Credit - Ramachandra Raju Instagram)

46

यानंतर बॉडीगार्ड रामचंद्र राजू बनला भयावह 'गरुडा'. दुसरीकडे, संजय दत्तने KGF 2 मध्ये भयंकर खलनायकाची भूमिका साकारली आहे. यामध्ये तो अधीराच्या भूमिकेत आहे. मात्र, गरुडाची कथा फ्लॅशबॅकमध्ये दाखवण्यात आली आहे. (Photo Credit - Ramachandra Raju Instagram)

56

केजीएफ 2 मध्ये देखील रामचंद्र राजूचा कॅमिओ पाहायला मिळणार आहे. केजीएफच्या पहिल्या चॅप्टरने रातोरात रामचंद्र राजूचे आयुष्य बदलून टाकले. त्याच्याकडे आता चित्रपटांच्या ऑफर्सची रांग लागल्याचेही म्हटले जाते. (Photo Credit - Ramachandra Raju Instagram)

66

राजूचा अभिनय अभिनेता पवन कल्याण आणि राणा दग्गुबाती स्टारर 'भीमला नायक' मध्ये देखील पाहायला मिळाला होता. या सिनेमात त्याने एका कैद्याची भूमिका केली होती. रश्मिका मंदाना आणि कार्ति स्टारर सुल्तानमध्ये देखील त्याने भूमिका साकारली होती. Maha Samudram सिनेमातून रामचंद्र राजूने तेलुगू सिनेमातही एंट्री केली. सध्या तो Jana Gana Mana (तमिळ) आणि Sthambam 2' (मलयाळम) या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. (Photo Credit - Ramachandra Raju Instagram)

  • FIRST PUBLISHED :