गेल्या काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूरचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
अभिनेत्रीचे हे व्हायरल फोटो पाहून ती तिसऱ्यांदा प्रेग्नेंट आहे, आणि तिचा बेबी बम्प दिसत असल्याची चर्चा रंगली होती.
या सर्व प्रकारानंतर आता करिना कपूरने स्वतः पोस्ट करत या गोष्टीमागचं सत्य उघड केलं आहे.
काही तासांपूर्वी करिना कपूरने आपल्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे.
यामध्ये अभिनेत्रीने लिहलंय, 'शांत राहा, मी प्रेग्नेंट नाहीय... सैफचं म्हणणं आहे त्याने आधीच लोकसंख्या वाढीत जास्त योगदान दिलं आहे'.
अशी मजेशीर पोस्ट करिना कपूरने आपल्या अकाउंटवर शेअर केली आहे.
त्यांनतर सोशल मीडियावर अनेक मेजशीर कमेंट्स पाहायला मिळत आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या मजेशीर अफवांची करिनाने स्वतः फिरकी घेतली आहे.