बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर आणि सैफ अली खान यांचा मुलगा तैमूर अली खान एखाद्या स्टारसारखा लोकप्रिय बनला आहे.
तैमूर अली खान सर्वात लोकप्रिय स्टारकिड्सपैकी एक आहे. तो सोशल मीडियावर सतत चर्चेत असतो. त्याचे बरेच फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
नुकतंच आई करीना कपूरने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तैमूरचे काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तो चक्क शेतात काम करताना दिसून येत आहे.
हा चिमुकला आपल्या शेतातून मुळ्याची भाजी काढताना दिसून येत आहे. अभिनेत्रीने कॅप्शन देत, 'गरम गरम मुळ्याचे पराठे' असं म्हटलं आहे.
नुकतंच करीना पती सैफ आणि दोन्ही मुलांसोबत मुंबई एयरपोर्टवर दिसून आली होती. यावेळी करीना आपल्या कुटुंबासोबत आपल्या खानदानी पॅलेसमध्ये सुट्टीसाठी रवाना झाली होती.
करीना सतत तैमूर आणि जेहचे गोंडस फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
यामध्ये तैमूर सतत कोणत्या ना कोणत्या कलात्मक गोष्टी करताना दिसून येतो. या वयापासूनच तैमूर प्रचंड हुशार आणि सक्रिय आहे.
तो कधी पेंटिंग करताना, तर कधी एक्सरसाईज करताना तर कधी विविध खेळ खेळतांना दिसून येतो.