'कारभारी लयभारी' फेम अनुष्का सरकटेने नुकतेचं सोशल मीडियावर काही फोटो शेयर केले आहेत.
अनुष्काचा हा अंदाज चाहत्यांना चांगलाच पसंत पडत आहे.
'कारभारी लयभारी' या मालिकेमुळे अनुष्का घरा घरात पोहोचली आहे.
या मालिकेमुळे अनुष्का 'पियू' या नावाने प्रसिद्ध झाली आहे.
या मालिकेतील राजवीर आणि पियूची जोडी चाहत्यांना चांगलीच पसंत पडली होती.
अनुष्काची ही पहिली मालिका नाही तरीसुद्धा या मालिकेने तिला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे.
याआधी अनुष्का 'लक्ष्मी नारायण' या मालिकेमध्ये झळकली होती.
यामध्ये अनुष्काने 'लक्ष्मी' मातेची भूमिका साकारली होती.
तसचं अनुष्का 'मी तुझीच रे' या मालिकेमध्ये सुद्धा महत्वाच्या भूमिकेत होती.
अनुष्का अलीकडे सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते.
ती सतत आपले विविध फोटो चाहत्यांसाठी शेयर करत असते.
चाहतेही तिच्या फोटोंना भरभरून दाद देत असतात.
अनुष्का ही मूळची औरंगाबादची आहे.
तिने अभिनयाचं रीतसर शिक्षण सुद्धा घेतलं आहे. तिने पुण्याच्या ललित कला केंद्रात अभिनयाचं शिक्षण घेतलं आहे.
अनुष्का सतत आपल्या मित्र मैत्रिणी आणि कुटुंबांसोबत एन्जॉय करताना दिसून येते.
लॉकडाऊन मुळे महाराष्ट्रात मालिकांचं शुटींग बंद होतं.
मात्र कारभारी लयभारी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या भेटीला येत आहे