बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आपल्या खाजगी आणि व्यावसायिक आयुष्यामुळे चर्चेत असते. परंतु आता कतरिना एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून कतरिनाचा भाऊ एका सुंदर बॉलिवूड अभिनेत्रीला डेट करत असल्याच्या चर्चा सुरु आहेत.
नुकतंच कतरिना कैफ करण जोहरचा प्रदिद्ध चॅट शो 'कॉफी विथ करण'मध्ये पोहोचली होती.
या शोमध्ये करण जोहरने स्वतः कतरिनाचा भाऊ स्टेबेस्टीयन आणि साऊथ आणि बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूज रिलेशनशिपमध्ये असल्याचं कन्फर्म केलं आहे.
ज्यावेळी कतरिनाला याबाबत विचारण्यात आलं तिने होकारही दिला नाही आणि नकारही. यावरुनच इलियाना तिची वाहिनी होणार असल्याचं कन्फर्म झालं आहे.
नुकतंच अभिनेत्री कतरिना कैफने मालदीवमध्ये आपला वाढदिवस साजरा केला होता.
यावेळी इलियाना डिक्रूज आणि स्टेबेस्टीयनसुद्धा त्यांच्यासोबत उपस्थित होते..
या लव्हबर्ड्सचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यामुळे ते दोघेही डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.