NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / कंगना Vs शिवसेना : 24 तासांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात कंगनाची डायलॉगबाजी

कंगना Vs शिवसेना : 24 तासांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात कंगनाची डायलॉगबाजी

BMC ने ऑफिस पाडल्यानंतर कंगना रणौतच्या (kanagna ranauat) अकरा वर्षांच्या मेहनतीने साकारलेल्या स्वप्नांचा चुराडा झाल्यानंतर तिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्यावर एकामागोमाग अशा संतप्त TWEET चा भडीमार केला आहे.

110

अभिनेत्री कंगना रणौत विरुद्ध शिवसेना असं युद्ध आता चांगलंच रंगलं आहे. सातत्याने बॉलिवूडवर निशाणा साधणाऱ्या कंगनाने आता थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. कंगनाने एकामागोमाग एक असे संतप्त ट्वीट केले.

210

कंगना मुंबईत पोहोचायच्या आधीच मुंबई महापालिकेने तिच्या ऑफिसवर कारवाई केली. कारवाईस सुरुवात झाल्यानंतर अभिनेत्री कंगना रणौतने मुंबई पाकिस्तान झाली असल्याचा पुनरुच्चार केला. "मी कधी चुकीची नव्हते आणि माझे शत्रू हे वारंवार सिद्ध करत आहेत की मुंबई आता PoK झाली आहे", असं ती म्हणाली.

310

कंगनाच्या ऑफिसवर तोडकाम करण्यासाठी पालिकेचे कर्मचारी जेव्हा पोहोचले तेव्हा कंगनाने ही बाबरची सैन्य असल्याचं म्हटलं. "मणिकर्णिका सिनेमाची अयोध्येत घोषणा झाली होती. त्यामुळे हे ऑफिस मला राम मंदिराप्रमाणेच आहे. आज इथं बाबर आले. इतिहास पुन्हा एकदा घडणार आहे. ज्या प्रकारे राम मंदिर पुन्हा बनलं. तसंच हे ऑफिसही परत तयार होणार आहे", असं कंगना म्हणाली.

410

मुंबईत आल्या आल्याच कंगनाने Video पोस्ट करून आपले इरादे निश्चित केलं. उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत "तुमने जो किया अच्छा किया. आज माझं घर तुटलं आहे, उद्या अहंकार तुटेल", असं ती उद्धव ठाकरेंना उद्देशून म्हणाली.

510

"काश्मिरी पंडितांवर काय परिस्थिती आली असेल, याचा अंदाज आज मला आला. आता मी फक्त अयोध्याच नाही तर काश्मीरवरही चित्रपट करेन", असा निश्चयही तिने केला.

610

दरम्यान करण जोहर आणि उद्धव ठाकरे यांचा एकत्र उल्लेख करत ती म्हणाली,  "करण जोहर आणि उद्धव ठाकरे यांची गँग येऊन त्यांनी माझं ऑफिस उद्ध्वस्त केलं. आता घर फोडाल, उद्या माझं तोंड फोडाल आणि माझा जीवही घ्याल. पण जगाला मला दाखवून द्यायचं आहे तुम्ही काय काय केलंय ते!

710

"मी जगले किंवा मेले तरी तुम्हाला एक्सपोज केल्याशिवाय राहणार नाही", असं म्हणत कंगनाने उद्धव ठाकरे आणि करण जोहर यांचं नाव घेत धमकी दिली.

810

यानंतर कंगनाने आताच्या शिवसेनेची तुलना थेट बाळासाहेबांच्या शिवसेनेशी केली. "ज्या विचारधारेच्या आधारे श्री बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची निर्मिती केली होती, आज त्यांनी सत्तेसाठी ती विचारधारा विकून शिवसेनेवरून सोनिया सेना बनले आहेत"

910

"ज्या गुंडांनी माझ्या मागे माझे घर तोडले त्यांना सिव्हिक बॉडी म्हणून नका, संविधानाचा इतका मोठा अपमान करू नका", असं ती म्हणाली.

1010

"आज हे माझ्याबरोबर झालं. हे कुणाहीबरोबर होऊ शकतं. जागे व्हा. अन्यायाविरुद्ध बोलायला हवं", असं म्हणत कंगनाने इतरांनाही साद घातली.असंही ती म्हणाली.

  • FIRST PUBLISHED :