NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / लग्न केल्याचा काजल अग्रवालला जबर फटका?, मानधनाच्या किंमतीत केली कपात

लग्न केल्याचा काजल अग्रवालला जबर फटका?, मानधनाच्या किंमतीत केली कपात

लग्न होताच काजल अग्रवालची लोकप्रियता झाली कमी? नव्या कामासाठी केली मानधात कपात

15

काजल अग्रवाल ही दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील एक आघाडिची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ‘येवडू’, ‘सरोजा’, ‘गणेश जस्ट गणेश’, ‘आर्या’, ‘डार्लिंग’, ‘विरा’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांद्वारे ती गेली दोन दशकं प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. इतकंच नव्हे तर तिनं ‘सिंघम’, ‘स्पेशल 26’, ‘दो लफ्जोंकी कहानी’, ‘मुंबई सागा’ यांसारख्या चित्रपटांच्या माध्यमातून बॉलिवूडमध्येही स्वत:ची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली.

25

परंतु गेल्या काही काळात तिच्या करिअरला काहीशी उतरती कळा लागली आहे. विशेष म्हणजे लग्नानंतर काजलला चित्रपटांच्या ऑफर येणं कमी झालं आहे. त्यामुळे अभिनेत्रीनं मोठा निर्णय घेत आपल्या मानधनात देखील कपात केली आहे.

35

सध्या कोरोनामुळं अनेक निर्मात्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झालं आहे. परिणामी काही चित्रपटांमधील मोठ्या कलाकारांना कमी करुन त्याऐवजी कमी मानधन घेणाऱ्या कलाकारांना संधी दिल्या जात आहे. अन् असा प्रकार तिच्या बाबतीत होईल अशी तिला भीती वाटतेय म्हणून तिनं माधनाची रक्कम कमी केली आहे.

45

काजलनं अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत तिच्याकडे कुठलंही नवं काम नसल्याचं मान्य केलं. अनेक मोठ्या निर्मात्यांनी कॉल करुन सांगतो असं उत्तर तिला दिलं. मात्र या उत्तरांमुळं काजलला आता आपल्या भविष्याची चिंता लागून राहिली आहे. खास करुन लग्न झाल्यापासून मिळणाऱ्या ऑफर कमी झाल्या असं एक निरिक्षण तिनं नोंदवलं आहे.

55

काजलकडे असलेल्या चित्रपटांची संख्या जरी कमी असली तरीही आता काजलच्या हातात सध्या काही मोठे चित्रपट आहेत. काजल लवकरच साउथचे सुपरस्टार चिरंजीवीच्या 'आचार्या' चित्रपटात मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे.

  • FIRST PUBLISHED :