साऊथ सुपरस्टार ज्युनियर एनटीआर हे साऊथ सिनेमाच्या समृद्ध इतिहासातील एक सोनेरी नाव आहे. 20 वर्षांच्या कारकिर्दीत, ज्युनियर एनटीआरने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केलं आहे. RRR मुळे जगभरात त्याचा तुफान चाहतावर्ग निर्माण झाला आहे. ज्युनियर एनटीआर अभिनयासोबतच त्याच्या नम्र स्वभावासाठी ओळखला जातो. परंतु आज आपण त्याच्या लग्नासंबंधित काही चकित करणाऱ्या गोष्टी जाणून घेणार आहोत.
ज्यू. एनटीआर अर्थातच तारक बाकी स्टार्सपेक्षा खूप वेगळा आहे असं म्हटलं जातं. कारण त्याच्या आयुष्यात आधी लग्न आणि नंतर प्रेम झालं होतं. साऊथ सुपरस्टार, ज्युनियर एनटीआरने लक्ष्मी प्रणतीशी 5 मे 2011 रोजी लग्नगाठ बांधली होती.
फार कमी लोकांना माहिती असेल की तारकचं लग्न हे आतापर्यंतच्या सर्वात महागड्या लग्नांपैकी एक आहे. काही रिपोर्ट्सनुसार, तारकच्या भव्य लग्नाचा एकूण बजेट तब्बल 100 कोटी रुपये इतका होता.
ज्युनियर एनटीआरच्या लग्नाबद्दल आणखी एक मनोरंजक तथ्य म्हणजे त्याची पत्नी लक्ष्मीने वरमालामध्ये परिधान केलेली एक कोटी रुपयांची साडी दान केली होती. लग्नमंडपाच्या सजावटीवर करोडो रुपये खर्च करण्यात आले होते. केवळ मंडप सुशोभित करण्यासाठी 18 कोटी रुपये खर्च झाल्याचे सांगण्यात येते.
ज्युनिअर एनटीआरच्या लग्नात तब्बल 3000 सेलिब्रिटी पाहुणे आणि 12,000 चाहत्यांनी हजेरी लावली होती. त्यामुळे हा सोहळा फारच भव्यदिव्य ठरला होता. ज्युनियर एनटीआरच्या लग्नामध्ये, देशभरातील उद्योगपती आणि राजकारणी देखील आले होते. तारकच्या लक्झरी लाइफस्टाइलचा आणि स्टारडमचा अंदाज तुम्हाला या लग्नातूनच येऊ शकतो. मात्र, अभिनेत्याला कधीच दिखावा करायला आवडत नाही.
हा विवाहसोहळा हायटेक्स एक्झिबिशन सेंटर, माधोपूर येथे पार पडला होता. हा विवाह 2011 मधील सर्वात मोठ्या विवाहांपैकी एक होता. या लग्नाची जगभरात चर्चा झाली होती.
ज्युनियर एनटीआर क्वचितच त्याची पत्नी लक्ष्मी प्रणती आणि त्यांची मुले, नंदामुरी भार्गव राम आणि नंदामुरी अभय राम यांच्यासोबत सार्वजनिक ठिकाणी दिसतो. तो नेहमी आपल्या कुटुंबाला इतर सर्व गोष्टींपेक्षा जास्त प्राधान्य देतो.