बॉलिवूडचा सुपरहिट आणि फिट अभिनेता जॉन अब्राहम याचा आज 47 वा वाढदिवस. अलिकडच्या काळात जॉनचे रॉ आणि बाटला हाऊस असे दोन सिनेमे रिलीज झाले. या दोन्ही सिनेमात तो अॅक्शन अवतारात दिसला. पन्नाशीकडे झुकत चाललेल्या जॉनचा फिटनेस आजच्या नव्या अभिनेत्यांना लाजवेल असाच आहे...
जाॅन आठवड्यातून चार वेळा जिममध्ये जातो. दर वेळी शरीराच्या वेगवेगळ्या भागांना व्यायाम होईल याची काळजी घेतो.
जाॅन बरेच व्यायाम स्टॅमिना वाढवण्यासाठी करतो. त्यात वेटलिफ्टिंग, कार्डिओ, जाॅगिंग हे प्रकार करतो.
अभिनेत्यांचं डाएट सिनेमाप्रमाणे बदललतं. फोर्स 1च्या वेळी जाॅन दिवसाला 25 अंडी खात होता, तर राॅकी हँडसमच्या वेळी तो दिवसाला 9 अंडी खात असे.
जाॅन मटन खात नाही. त्याचा सगळा भर मासे, ताज्या भाज्या, फळं, अंडी यावर असतो. तो तेलकट पदार्थ खात नाही. चपातीत बाजरीचं पिठ मिक्स करून खातो.
जाॅन दिवसातून सहा वेळा खातो. दर वेळी आहारात 50 टक्के प्रोटिन्स, 25 टक्के कार्बोहायड्रेड आणि 25 टक्के फायबर असण्याची तो काळजी घेतो.