फिटनेससाठी ओळखला जाणारा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता म्हणजे जॉन अब्राहम.
अभिनेता जॉन अब्राहम आज त्याचा 50 वा वाढदिवस साजरा करत आहे.
अभिनयाच्या जगात येण्यापूर्वी जॉन अब्राहमने मॉडेलिंगमध्ये प्रसिद्धी मिळवली होती.
जॉन अब्राहमने 2003 मध्ये जिस्म या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
जॉन अब्राहम जास्त करुन अॅक्शन चित्रपटात झळकतो. त्याच्या फिटनेसचे अनेक चाहते आहेत.
स्वतःला फिट ठेवण्यासाठी जॉन अब्राहम आपल्या आहारात भरपूर प्रोटीन घेतो. याशिवाय तो दूध आणि दही यांसारखे दुग्धजन्य पदार्थ आणि स्प्राउट्स, सोया आणि कडधान्ये यांसारखी वनस्पती आधारित गोष्टी खातो.
फायबरसाठी जॉन आपल्या आहारात हिरव्या भाज्या आणि फळे देखील घेतो. जॉन अब्राहम आपल्या शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी आपल्या आहारात शाकाहारी आणि मांसाहारी आहाराचा समतोल राखतो.
जॉन अब्राहमने फिटनेसच्या नाहात 25 वर्षापासून गोड मिळाईदेखील खाल्ली नाही. तो साखर, पांढरे पीठ, तेलकट अन्न आणि भातही खात नाही.