बिग बॉस मराठी शो सध्या फारच चर्चेत आहे. शोमध्ये घेतले जाणारे टास्क आणि त्यादरम्यान होणारे वादविवाद यामुळे प्रेक्षक शोकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहेत.
'डब्बा गुल' टास्क आणि त्यातील राडे यांनतर आता घरात थोडं भावनिक वातावरण पाहायला मिळणार आहे. कारण आजच्या भागात शोमध्ये 'जी माझा गुंतला'फेम अंतरा आणि मल्हारची एन्ट्री होणार आहे.
अंतरा आणि मल्हार घरामध्ये काही खास कारणासाठी आलेले आहेत. त्यांच्या येण्याने घरातील सदस्यांना एक खास सरप्राईज मिळणार आहे.
अंतरा आणि मल्हारनं स्पर्धकांसाठी त्यांच्या कुटुंबियांचे काही खास मेसेज आणले आहेत. त्यामुळे स्पर्धक खूपच भावुक झाले आहेत.
सर्वत्र दिवाळीची धामधूम सुरु होती. स्पर्धक आपल्या घरापासून दूर बिग बॉसच्या घरात दिवाळी साजरी करत आहेत. त्यामुळे त्यांना हे खास सरप्राईज देण्यात आलं आहे.
काल नुकताच भाऊबीज पार पडली. त्यामुळे त्यांच्या भावंडांची पत्र त्यांच्यासाठी अंतरा आणि मल्हारने आणली आहेत.
ही पत्रं पाहून सर्व स्पर्धक भावुक झालेलं प्रोमोमध्ये दिसत आहे. मीरा, तृप्ती, मीनल असे सर्वच स्पर्धक पत्र पाहून रडायला चालू करतात.
हा खास एपिसोड आपल्याला आज पाहायला मिळणार आहे. प्रोमो पाहूनच प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.