'जीव माझा गुंतला' मालिकेच्या माध्यमातून अंतरा आणि मल्हार घराघरात पोहोचले आहेत. ही मालिका अतिशय लोकप्रिय झाली आहे.
मालिकेतील अंतरा आणि मल्हारची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड पसंत पडते. या मालिकेत अभिनेत्री योगिता चव्हाण आणि अभिनेता सौरभ चौघुलेने मुख्य भूमिका साकारली आहे.
ऑनस्क्रीनप्रमाणे ऑफस्क्रीनसुद्धा योगिता आणि सौरभची केमिस्ट्री फारच छान आहे. दोघे सतत एकमेकांसोबत धम्माल करतांना दिसून येतात.
योगिता आणि सौरभ नेहमीच सेटवरील आपले मजेशीर फोटो आणि रील्स शेअर करत सर्वांचं लक्ष वेधत असतात.
अंतरा अर्थातच योगिता काही दिवसांपूर्वी इटलीला गेली होती. अभिनेत्री आपल्याला मैत्रिणीला भेटण्यासाठी गेली होती.
योगिताने इटलीहून येताना आपल्या सह कलाकार मित्रांसाठी काही भेटवस्तू आणल्या आहेत.
सौरभसाठी योगिताने इटलीची प्रसिद्ध चाय पॉट अर्थातच चहाची किटली आणली आहे. सौरभला नेहमीच ती किटली घेण्याची हौस होती. जी आता योगितामूळे पूर्ण झाली आहे.
योगिता आणि सौरभ सध्या अंतरा आणि मल्हारच्या रूपात महाराष्ट्रातील प्रेक्षकांचं मन जिंकत आहेत.