FDCI Lakme Fashion Week 2022 : लॅकमेच्या फॅशन वीकमध्ये जान्हवी कपूरचा फॅशनचा जलवा पाहायला मिळाला.
यावेळी जान्हवी कपूर डिझायनर पुनित बालानासाठी शोस्टॉपर बनली होती.
रॅम्पवर चालताना सर्वांच्या नजरा तिच्यावरच खिळल्या होत्या.
जान्हवी कपूरनं यावेळी विटकरी लंगाचा ब्रायडल लुक केला होता. हा कुल ब्रायडल लुक सर्वांचे लक्षवेधून घेत होता.
जान्हवी कपूरनं विटकरी रंगाचा लेहेंगा आणि त्यावर हाप ब्लाऊज देखील घातले होते. बारीक नकक्षीकाम यावर केलेले दिसत आहे.
जान्हवी कपूरनं तिच्या इन्स्टावर तिच्या या कुल ब्राईडल लुकचे फोटो शेअर केले आहेत.
चाहत्यांना देखील तिचा हा लुक प्रचंड आवडलेला दिसत आहे. चाहत्यांकडून यावर कमेंटचा वर्षाव होत आहे.
जान्हवी कपूर सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. तिचे फोटो व व्हिडिओ ती शेअर करत असते.
जान्हवीनं नुकताच तिचा वाढदिवस तिच्या गर्ल गॅंगसोबत शेअर केला. त्याचे फोटो देखील सोशल मीडियावर तिनं सोशल मीडियावर शेअर केले होते. ( फोटो साभार- जान्हवी कपूर इन्स्टा )