जान्हवी कपूर बी-टाऊनमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.
जान्हवी तिच्या प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत असते, पण सध्या ती अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या शिखर पहाडियासोबतच्या तिच्या नात्यामुळे चर्चेत आहे.
जान्हवी कपूर पुन्हा एकदा एक्स बॉयफ्रेंड शिखरला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
शनिवारी शिखर आणि जान्हवी दिल्लीत एका कार्यक्रमादरम्यान स्पॉट झाले होते. तेव्हापासून पुन्हा ते एकमेकांना डेट करत असल्याचं चर्चा रंगल्या आहेत.
गेल्या काही काळापासून ओरहान अवत्रामणीसोबत जान्हवीचं नाव जोडलं जात होतं मात्र आता पुन्हा एक्स बॉयफ्रेंड शिखला डेट करत असल्याचं समोर आलंय.
शिखर पहारिया हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा नातू आहे.
जान्हवीने शिखरला काही काळ डेट होते. त्यानंतर दोघे वेगळे झाले.