NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / जान्हवी कपूरला 3 जानेवारीला झाली होती कोरोनाची लागण, समोर आली हेल्थ अपडेट

जान्हवी कपूरला 3 जानेवारीला झाली होती कोरोनाची लागण, समोर आली हेल्थ अपडेट

जान्हवीसोबतच बहीण खुशी कपूरचासुद्धा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.

18

कोरोनाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. फक्त सर्वसामान्य लोकच नव्हे तर सेलेब्रेटींनासुद्धा कोरोनाची झपाट्याने लागण होत आहे.

28

या यादीमध्ये बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरचासुद्धा समावेश आहे. जान्हवीसोबतच बहीण खुशी कपूरचासुद्धा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.

38

याबद्दल आत्ता इन्स्टाग्राम अकाउंटवर जान्हवी कपूरने पोस्ट लिहीत खुलासा केला आहे.

48

अभिनेत्रीने पोस्ट लिहीत म्हटलं आहे, 'नमस्कार मित्रांनो, 'माझा आणि माझ्या बहिणीचा ३ जानेवारीला कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता'.

58

'आम्ही बीएमसीमार्फत सांगण्यात आलेल्या सर्व नियमाचं पालन केलं आहे. आम्ही दोघी होम आयसोलेशनमध्ये होतो'.

68

'आता आमचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे'. पहिले दोन दिवस आमच्यासाठी फारच कठीण होते. परंतु नंतर सर्वकाही ठीक होत गेलं'. असंही जान्हवी म्हणाली.

78

तसेच अभिनेत्रीने आपल्या चाहत्यांना सल्ला देत म्हटलं आहे, 'सध्या या महामारी पासून स्वतःचा वाचवण्याचा एकच मार्ग आहे. 'मास्क लावा आणि कोरोना लस घ्या'.

88

सध्या ख़ुशी आणि जान्हवी एकत्र राहून आपली काळजी घेत आहेत.

  • FIRST PUBLISHED :