इरफान खान हा बॉलिवूडमधील अष्टपैलू अभिनेत्यांपैकी एक समजला जातो. अभिनेत्याच्या अचानक निधनाने सर्वच हादरले होते.
दरम्यान आजही चाहते अभिनेत्यावर तितकंच प्रेम करतात. आणि त्याच्या आठवणीत रमलेले दिसतात.
दरम्यान आता इरफान खानच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.
अभिनेत्याचा एक आंतरराष्ट्रीय सिनेमा आता पडद्यावर पुन्हा रिलीज होणार आहे.
या सिनेमाचं नाव आहे 'द सॉंग्स ऑफ स्कार्पियन्स' असं आहे. हा सिनेमा २०१७ मध्ये रिलीज झाला होता.
इरफान खानच्या या सिनेमाने नेहमीप्रमाणेच प्रचंड वाहवाह मिळवली होती.
परंतु हा सिनेमा फ्रेंच, स्विस, आणि राजस्थानी भाषेत रिलीज झाला होता.
त्यामुळेच आता इरफानच्या चाहत्यांसाठी हा सिनेमा हिंदीमध्ये रिलीज करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुलगा बाबिलने या सिनेमाचं पोस्टर शेअर करत माहिती दिली आहे.
हा सिनेमा येत्या 28 एप्रिलला पडद्यावर रिलीज होणार आहे. चाहते सध्या उत्सुक आहेत.