देशभरात सध्या आयपीएलची धूम सुरु आहे. त्यामुळे चाहते आपल्या आवडत्या खेळाडूच्या प्रत्येक गोष्टीकडे डोळे लावून आहेत.
त्यामुळेच या खेळाडूंच्या व्यावसायिक आयुष्यासोबतच खाजगी आयुष्यसुद्धा चर्चेत आलं आहे.
यामध्ये स्टार क्रिकेटर शुभमन गिलचं नाव सर्वात आधी येतं. सध्या शुभमनचं खाजगी आयुष्य प्रचंड चर्चेत आलं आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून शुभमन गिल रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा होत आहेत. मात्र शुभमन गिल सारा तेंडुलकर की सारा अली खान नेमकं कुणाला डेट करत आहे? असा प्रश्न सर्वांना पडत आहे.
दरम्यान सारा अली खानसोबत शुभमनचा एयरपोर्टवरील एक फोटो व्हायरल झाला होता. त्यामुळे शुभमन सारा अली खानसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.
अशातच आता एकीकडे आयपीएल सुरु असताना दुसरीकडे मात्र शुभमन आणि सारा अली खानचा ब्रेकअप झाल्याचं म्हटलं जात आहे.
शुभमन आणि सारा अली खानने एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्याने या चर्चांना उधाण आलं आहे.