अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिनामध्ये राहणारी मॉडेल जेसिका सुनोकनं इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून जवळपास महिन्याला 76 लाख रुपये कमवत असल्याचा खुलासा केला आहे.
सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये जेसिकानं सांगितलं की, ती सुरुवातीला सेल्स मॅनेजर म्हणून काम करत असे. ज्यातून तिला 900 रुपये प्रति तास याप्रमाणे पगार दिला जात असे.
जेसिकाच्या मते आता ती एवढी प्रसिद्ध झाली आहे की तिला प्रत्येक महिन्याला जवळापास लग्नासाठी 50 मुलांची प्रपोजल्स येत असतात.
डेली स्टारनं दिलेल्या वृत्तानुसार जेसिकाचे इन्स्टाग्रामवर 5 लाख 80 हजारांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.
जेसिका एक बिकिनी मॉडेल असून ती इन्स्टाग्राम पोस्ट, बिकिनी ब्रॅन्ड आणि अन्य जाहिरातीच्या माध्यमातून महिन्याला 76 लाखांपेक्षा जास्त रुपये कमवते.
जेसिका सांगते 2012 मध्ये तिचं ब्रेकअप झालं होतं ज्यानंतर तिचं आयुष्य बदलून गेलं. त्यानंतर तिनं बिकिनी मॉडेल म्हणून काम सुरू केलं.
जेसिकाच्या यशात इन्स्टाग्रामचा मोठा वाटा आहे. यामुळे तिला या करिअरमध्ये यश मिळत गेलं.
इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमुळे तिला बिकिनी कॉन्टेस्ट आणि जाहिराती मिळत गेल्या.
जेसिका सांगते तिला प्रत्येक महिन्यात लग्नासाठी किमान 50 प्रस्ताव तर नक्कीच येतात. तर काही चाहते तिचं लक्ष वेधून घेण्यासाठी तिच्या अकाउंटमध्ये पैसे पाठवतात असं जेसिकाचं म्हणणं आहे.
जेसिका सांगते माझं माझ्या चाहत्यांवर प्रेम आहे त्यामुळे मी कोणाकडून पैसे घेत नाही. ते जेव्हा माझं कौतुक करतात त्यातून मला आनंद मिळतो आणि माझ्यासाठी तेवढं पुरेसं आहे.