मुंबई : इंडियन आयडल सिझन 2 मध्ये एका स्पर्धक खूप चर्चेत आला ते त्याच्या मधूर आवाजामुळे. त्याचं गाण ऐकून त्याच्या प्रेमात पडावं असा त्याचा आवाज होता. या स्पर्धकाने नेहा कक्कडलाही वेड लावलं होतं. इंडियन आयडलचे विजेतेपद त्याने पटकवलं. मात्र त्याने अचानक जगाचा निरोप घेतला. आज या गायकाबद्दल जाणून घेणार आहोत.
वयाच्या 29 व्या वर्षी आपली पत्नी आणि मुलीला मागे सोडून या गायकाने जगाचा निरोप घेतला. त्याची आजाराशी झुंज अपयशी ठरली. त्याच्या जाण्यात संगीत विश्वात हळहळ व्यक्त करण्यात आली. त्याच्या आवाजाची जादू आजही रसिकांच्या मनात कायम आहे.
संदीप आचार्य हा राजस्थानमधील बिकानेरचा रहिवासी होता. त्याने इंडियन आयडलच्या दुसऱ्या हंगामाचं विजेतेपदही पटकावलं होतं. त्याच वेळी त्याने सोनी बीएमजी सोबत एक कोटीचं कॉन्ट्रॅक्ट केलं होतं.
त्याला अल्बम म्युझिकसोबत एक कारही गिफ्ट मिळाली होती. त्या हंगामात नेह कक्कड आली होती. संदीप आचार्यने आपल्या आवाजाने तिलाही वेड लावलं. नेहा त्याच्या आवाजाची फॅन झाली.
इंडियन आयडलमुळे त्याचं आयुष्य बदललं होतं. तो साधारण अडीच ते तीन लाख एका शोची फी घ्यायचा. त्याने परदेशातही आपले कार्यक्रम केले. त्याच्या मधुर आवाजामुळे तो कमी वेळात लोकांच्या हृदयात लवकर स्थान निर्माण करू शकला.
१५ डिसेंबर 2013 रोजी संदीप आचार्य याचा एका आजाराने मृत्यू झाला. सर्वात वाईट गोष्ट म्हणजे मुलीच्या वाढदिवसांच्या अगदी काहीदिवस आधी त्याचा मृत्यू झाला.