Home » Photo Gallery » entertainment » IN TRP RATING TUZYAT JIV RANGALA BECOMES NO 1 SERIAL ON ZEE MARATHI MHSD
News18 Lokmat | July 04, 2019, 18:32 IST |

TRP मीटर : गुरू-शनायाला कुणी दिला धक्का? 'ही' मालिका ठरली नंबर 1

TRP Meter, Mazya Navryachi Bayako, Sambhaji - प्रेक्षकांना दर आठवड्याच्या TRP रेटिंगबद्दल उत्सुकता असते. या वेळी या रेटिंगनं एक धक्काच दिलाय. कुठल्या मालिकेनं काय स्थान पटकावलंय यावर टाकू एक नजर

प्रेक्षकांना दर आठवड्याच्या TRP रेटिंगबद्दल उत्सुकता असते. या वेळी या रेटिंगनं एक धक्काच दिलाय. कुठल्या मालिकेनं काय स्थान पटकावलंय यावर टाकू एक नजर.
1/ 7

प्रेक्षकांना दर आठवड्याच्या TRP रेटिंगबद्दल उत्सुकता असते. या वेळी या रेटिंगनं एक धक्काच दिलाय. कुठल्या मालिकेनं काय स्थान पटकावलंय यावर टाकू एक नजर.

2/ 7

कलर्स मराठीवरच्या बिग बाॅस मराठीला टक्कर देण्यासाठी चला हवा येऊ द्या शो आठवड्यातून चार दिवस केला. त्याचा फायदा शोला झाला. गेल्या वेळी हा शो पाचव्या स्थानावर होता. याही वेळी तो पाचव्याच स्थानावर आहे. बिग बाॅस मराठी मात्र पहिल्या पाचात अजून तरी आलेला नाही.

3/ 7

गेल्या वेळी तिसऱ्या स्थानावर असलेली 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिका यावेळी चौथ्या स्थानावर आलीय. या टीआरपीच्या आठवड्यात कारभाऱ्यांना शोधण्यात वेळ दाखवला होता. बऱ्याच दिवसांनी मालिकेत आउटडोअर शूटिंग पाहायला मिळालं. प्रत्येक व्यक्तिरेखेनं इतिहास जिवंत केलाय.

4/ 7

टीआरपी रेटिंग्ज दर आठवड्याला येतात. याही वेळी पहिल्या पाचात झी मराठीच आहे. बिग बाॅस मराठी, जिवलगा यांची एंट्री अजून झालेली नाही.

5/ 7

तुझ्यात जीव रंगला तिसऱ्या नंबरवर आहे. या आठवड्यात राणादाची राजा बनून एंट्री झालीय. राणाचा मेकओव्हर आता प्रेक्षकांना कसा वाटतोय, ते कळेल. त्यामुळे ही मालिका एक स्थान वर सरकलीय.

6/ 7

नेहमी पहिल्या स्थानावर असलेली माझ्या नवऱ्याची बायको मालिका यावेळी मात्र दुसऱ्या नंबरवर आलीय. गुरूचा खोटारडेपणा राधिकाला कळलाय. ती शनायाच्या मदतीनं गुरूचं खरं रूप सगळ्यांसमोर आणणार आहे. या मालिकेचे फॅन्स तसेच आहेत. पण दुसऱ्या मालिकेचे फॅन्स वाढल्यानं माझ्या नवऱ्याची बायको दुसऱ्या स्थानावर पोचली.

7/ 7

लागीरं झालं जी मालिकेचा शेवटचा आठवडा कमालीचा यशस्वी ठरलाय. कधीही पहिल्या पाचात नसलेली ही मालिका संपता संपता नंबर वन ठरलीय. प्रेक्षकांनी अज्या-शीतलीला इमोशनल होत निरोप दिला आणि ती जास्त बघितली गेली.

Published by:Sonali Deshpande
First published:July 04, 2019, 18:32 IST

ताज्या बातम्या

सुपरहिट बॉक्स