शंभुराजांवर झालेल्या पहिल्या घातपातानंतर संपूर्ण स्वराज्यात सुरक्षेचं प्रमाण वाढवलं आहे.
यातच येसुबाई रायगडावर राजाराम राजांच्या बायकोची मंगळागौर करायचं ठरवतात.
गडावर काहीही सण साजरे करू नका, बाहेरून येणाऱ्यांवर बंदी घाला हे शंभुराजांचे आदेश आहेत. सोयराबाईंना शब्द दिल्याने येसुबाई मंगळागौर रद्द करू शकत नाहीत.
हे समजल्यावर शंभुराजे त्यांच्या जवळच्या सर्व सेवकांना रायगडी पाठवतात. तेथील सुरक्षा कडक करतात.
मात्र दुसरीकडे शंभुराजांवर पुन्हा एकदा हल्ला होतो. त्यांच्या बिछान्यावर, गादीवर तलवारीचे वार सापडतात.
यामागे अनाजी पंतांचा हात आहे हे उघड होत असतानाच संभाजी महाराजांवर विषप्रयोग होतो आणि ते यातून थोडक्यातच बचावतात.
येत्या रविवारी 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेचा महाएपिसोड आहे. यात कटकारस्थानं उघड होणार आहेत.