स्टार प्रवाहवर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मालिका सुरू आहे. यात डाॅ. आंबेडकरांच्या आयुष्यातले सगळे टप्पे दाखवले जातायत.
या मालिकेतल्या छोट्या आंबेडकरांची भूमिका साकरली अमृत गायकवाडनं. मालिकेसाठी जेव्हा ऑडिशन सुरु होती तेव्हा अमृतला त्याबद्दल कळलं आणि त्याने थेट ऑडिशनचं ठिकाण गाठलं. त्याचा उत्साह आणि हजरजबाबीपणा भाव खाऊन गेला आणि अमृतची छोट्या आंबेडकरांच्या रोलसाठी निवड झाली.
आता या मालिकेत रमाबाई म्हणजे बाबासाहेबांच्या पत्नीची एंट्री होतेय.मृण्मयी सुपल बालपणीच्या रमाची भूमिका साकारणार आहे.
डाॅ. आंबेडकरांच्या प्रत्येक आंदोलनाच्या वेळी रमाबाई त्यांच्या पाठी उभ्या राहिल्या. आता मृण्मयी ही भूमिका साकारण्यासाठी खूप मेहनत घेतेय. मुख्य म्हणजे मालिकेतली बोलीभाषा शिकतेय. तशी देहबोली शिकतेय.
प्रेक्षकांना इतिहास पाहायला नेहमीच आवडतो. त्यामुळे स्टार प्रवाहही या मालिकेसाठी भरपूर मेहनत घेतंय.
सागर देशमुख डाॅ. बाबासाहेबांची भूमिका साकारणार आहे, तर मोठ्यापणीच्या रमाबाई साकारतेय अभिनेत्री शिवानी रांगोळे.