साऊथ आणि बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूजने काही दिवसांपूर्वी आपल्या प्रेग्नेंसीची बातमी देत सर्वांनाच चकित केलं होतं.
अभिनेत्रीने लग्नापूर्वीच आई होण्याचा निर्णय घेतल्याने अनेकांच्या भुवय्या उंचावल्या होत्या.
इलियानाने गुड न्यूज दिल्यापासून तिच्या होणाऱ्या बाळाचा पिता कोण आहे? घेण्यासाठी चाहते धडपड करत आहेत.
शिवाय अभिनेत्रीने गुपचूप लग्न उरकल्याच्या चर्चुसुद्धा रंगल्या आहेत.
अशातच आता इलियाना डिक्रूज एका सीक्रेट ठिकाणी बेबीमूनचा आनंद घेत आहे.
विशेष म्हणजे यावेळी ती एकटी नसून तिचा फियॉन्सेसुद्धासोबत आहे.
अभिनेत्रीने एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती आपल्या साखरपुड्याची अंगठी दाखवताना दिसून येत आहे.
मात्र इलियानाने अद्याप आपल्या फियॉन्सेचा चेहरा दाखवला नाही. फक्त अभिनेत्रीने त्याचा हात हातात घेऊन अंगठी दाखवतानाचा फोटो शेअर केला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून इलियाना कतरीना कैफच्या भावाला डेट करत असल्याची चर्चा होती.