अभिनेत्री इलियांना डिक्रूझ तिच्या बोल्ड लुकमुळे नेहमीच खूप चर्चेत असते. तिचा कोणताही फोटो सोशल मीडियावर व्हायरल व्हायला वेळ लागत नाही.
सध्या इलियाना सिनेमापासून दूर अंदमान-निकोबारमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. या व्हेकेशनचे काही फोटो तिनं तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. ज्यात बोल्ड बिकिनी अवतारात दिसत आहे.
इलियानाचा हा बिकिनी लुक सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून चाहते तिच्या या लुकचं कौतुक करताना दिसत आहेत.
अशाप्रकारे बोल्ड फोटो शेअर करण्याची इलियानाची ही पहिलीच वेळ नाही. ती नेहमीच बिकिनीतील फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.
इलियाना तिच्या फिटनेसची विशेष काळजी घेते. अनेकदा तिचे वर्कआऊट व्हिडीओ सुद्धा व्हायरल होताना दिसतात. या फिटनेसमुळे तिच्या बिकिनी लुकची सर्वाधिक चर्चा होते.
काही काळापसूर्वीच इलियानाचं ब्रेकअप झालं होतं. तिनं सोशल मीडियावरूनच अँड्र्यू नीबोनसोबतचं नातं संपवल्याचं सांगितलं होतं.
काही दिवसांपूर्वीच तिचा पागलपंती हा सिनेमा रिलीज झाला. हा सिनेमा फ्लॉप झाला असला तरीही तिच्या अभिनयाचं कौतुक झालं.