रणबीर कपूरच्या बर्फी सिनेमातून बॉलिवूडमध्ये एंट्री करणारी अभिनेत्री इलियाना डिक्रूझ नेहमीच तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असते.
इलियानानं बॉलिवूडमध्ये स्वतःचं वेगळ स्थान निर्माण केलं आहे. तिचा सोशल मीडियावरही स्वतःचा वेगळा चाहता वर्ग आहे.
इलियानानं तिच्या इन्स्टाग्रामवर नुकताच एक बिकिनी फोटो शेअर केला आहे. ज्याची सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चा आहे.
इलियानाचा हा बिकिनी फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यात ती टोन्ड बॉडी फ्लॉन्ट करताना दिसत आहे. पण यात इलियानाचा चेहरा मात्र दिसत नाही.
इलियानाच्या या फोटोवर तिच्या चाहत्यांच्या वेगवेगळ्या कमेंट पाहायला मिळत आहेत. अनेकांनी तिच्या या हॉट लुकचं कौतुक केलं आहे. या फोटोला खूप लाइक्सही मिळत आहेत.
अनेकांनी इलियानाच्या या फोटोवर 'हॉट', 'फायर', 'सेक्सी', 'गॉर्जेस' अशा कमेंट केल्या आहेत. पण एका युजरनं तर इलियानाला सर्वात हॉट महिलाचा किताब देऊ केला आहे.
खरं तर अशाप्रकारे बिकिनी किंवा हॉट फोटो शेअर करण्याची ही इलियानाची पहिली वेळ नाही. याआधीही अनेकदा तिनं असेच बिकिनी फोटो शेअर केले आहेत.