बॉलिवूडसाठी सर्वात महत्त्वाचा मानला जाणारा आयफा अवॉर्ड सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. यावेळी जवळपास सर्वच तारे-तारकांनी या सोहळ्याला हजेरी लावली. अगदी रेखा पासून ते सारा अली खान पर्यंत सर्वांचेच स्वॅग लुक ग्रीन कार्पेटवर पाहायला मिळाले.
अभिनेत्री आलिया भटला आयफाचा 'राझी' या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा अवॉर्ड देण्यात आला.
पद्मावतमध्ये रणवीर सिंहनं साकरलेली 'खिल्जी'ची खलनायकी भूमिका प्रचंड गाजली होती. या भूमिकेसाठीच रणवीरला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा अवॉर्ड देण्यात आला.
दिग्दर्शक श्रीराम राघवन यांना 'अंधाधुन' या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा अवॉर्ड देण्यात आला.
अभिनेत्री सारा अली खाननं केदारनाथ या सिनेमातून मागील वर्षी बॉलिवूड पदार्पण केलं होतं. साराला यंदाचा आयफा बेस्ट डेब्यू (अभिनेत्री) अवॉर्ड देण्यात आला.
अभिनेता इशान खट्टरला बेस्ट डेब्यू (अभिनेता) अवार्ड देण्यात आला. इशाननं 'बियॉन्ड द क्लाउड्स'मधून बॉलिवूड पदार्पण केलं होतं.
अभिनेता शाहिद कपूरचा आयफा अवॉर्ड लुक. शाहिदचा नुकताच रिलीज झालेला 'कबीर सिंह' प्रचंड गाजला.
अभिनेत्री दीपिका पदुकोणनं आयफा अवॉर्डसाठी पर्पल कलरचा ट्रेल गाउन परिधान केला होता. तिच्या या मनमोहक लुकवर सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. या ड्रेसमुळे दीपिका आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली.
टीव्हीनंतर बॉलिवूडमध्ये पाऊल टाकणारी ग्लॅमरस मौनी रॉयनं आयफा अवॉर्डसाठी पिस्ता कलरचा गाऊन घातला होता.
मराठमोळं कपल जेनेलिया आणि रितेश देशमुखनं ग्रीन कार्पेटवर सर्वांचं लक्षं वेधलं.
बॉलिवूडची 'धकधक गर्ल' माधुरी दीक्षित आयफा अवॉर्डच्या ग्रीन कार्पेटवर रेड कलरच्या गाउनमध्ये सर्वांची मनं जिंकली.
अभिनेत्री रेखा यांनी सुद्धा आयफा अवॉर्डला हजेरी लावली. त्यांच्या गुलाबी आणि ग्रीन साडीतील लुकवर सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या.
अभिनेता सलमान खाननं अभिनेत्री सई मांजरेकरसोबत आयफा अवॉर्डला हजेरी लावली. सई मांजरेकर ही अभिनेता आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची मुलगी असून ती 'दबंग 3'मध्ये सलमान खानसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.
अभिनेत्री उर्वशी रौतेला व्हाइट कलरच्या गाऊनमध्ये खूपच ग्लॅमरस दिसत होती.
सध्या तरुणाईमध्ये लोकप्रिय असेलला अभिनेता विकी कौशलनं सुद्धा या सोहळ्याला हजेरी लावली. विकीला 'संजू' सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा अवॉर्ड देण्यात आला.
डिंपल गर्ल प्रीती झिंटा सुद्धा आयफा अवार्डसाठी उपस्थित होती. यावेळी तिनं परिधान केलेल्या शिमरी रंगाच्या गाऊननं सर्वांचं लक्ष वेधलं.