बॉलिवूडचा सुपरहिट अभिनेता रणवीर सिंग सध्या त्याच्या आगामी ८३ सिनेमाच्या चित्रीकरणासाठी इंग्लंडमध्ये गेला आहे. माजी क्रिकेटपटू कपिल देव यांच्या जीवनावर ८३ सिनेमाची कथा साकारली गेली आहे. यात रणवीर कपिल देव यांची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी धर्मशाला येथे सिनेमाच्या टीमने अनेक माजी क्रिकेटरसोबत क्रिकेटचे धडे गिरवले. सध्या रणवीरचे दिग्गज क्रिकेटरांसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरची रणवीरने नुकतीच इंग्लंडमध्ये भेट घेतली. सचिन आणि रणवीरचा हा फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
सचिनशिवाय रणवीरचा ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू शेन वॉर्नसोबतचा फोटोही व्हायरल होत आहे.सचिनशिवाय रणवीरचा ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू शेन वॉर्नसोबतचा फोटोही व्हायरल होत आहे.
रणवीर सिंगने नुकतेच भारतीय क्रिकेट संघाचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्करचीही भेट घेतली.
याशिवाय वेस्टइंडीजचे माजी क्रिकेटपटू विव रिचर्ड्स यांच्यासोबतही रणवीर सिंगने खास भेट घेतली आणि त्यांच्यासोबत फोटो काढला.