बॉलिवूडमधील सर्वात हँडसम अभिनेत्यांपैकी एक म्हणून हृतिक रोशनला ओळखलं जातं. अभिनेत्यावर कोट्यावधी तरुणी फिदा आहेत.
हृतिक रोशनने काही दिवसांपूर्वी आपली पहिली पत्नी सुझैन खानसोबत घटस्फोट घेत सर्वांनाच धक्का दिला होता.
दरम्यान आता हृतिक रोशन अभिनेत्री-गायिका सबा आझादसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.
विशेष म्हणजे सबा आझाद हृतिकपेक्षा तब्बल 12 वर्षांनी लहान आहे.
आता अभिनेता सबासोबत लव्ह इनमध्ये राहणार असल्याची चर्चा सुरु आहे.
हृतिकने सबासाठी जवळपास 100 कोटींचा बंगला खरेदी केल्याचं म्हटलं जात आहे. यामध्येच ते दोघे एकत्र राहणार असल्याचं सांगितलं जात आहे.
दरम्यान हे दोघे लग्न करणार की नाही? असा प्रश्न चाहते विचारत आहेत. तसेच मीडिया रिपोर्ट्सनुसार लवकरच दोघे लग्नगाठ बांधणार असल्याचं म्हटलं जात आहे.