'देवयानी' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली मराठी अभिनेत्री म्हणजे भाग्यश्री मोटे होय. आजही ही अभिनेत्री आपल्या या दमदार भूमिकेसाठी ओळखली जाते.
नुकतंच या अभिनेत्रीने साखरपुडा उरकत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चाहत्यांना भाग्यश्रीच्या लग्नाबाबत उत्सुकता लागून आहे.
दरम्यान अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडा करत आपल्या नव्या आयुष्याच्या दिशेने एक पाऊल टाकलं आहे.
भाग्यश्री मोटेच्या साखरपुड्यानंतर आयोजित पार्टीत बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन उपस्थित होता. इतकंच नव्हे तर हृतिकसोबत त्याची गर्लफ्रेंड सबा आझादसुद्धा उपस्थित होती.
अनेकांना हा प्रश्न पडला आहे की, भाग्यश्रीच्या साखरपुड्यात हृतिकची उपस्थिती कशी? तर याबाबत आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो.
भाग्यश्री मोटेचा होणार नवरा विजय पलांडे हा बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनचा मेकअप आर्टिस्ट आहे.
विजय हृतिकचा फारच खास आहे. त्यामुळे त्यांच्या या आनंदाच्या क्षणात हृतिक न चुकता सहभागी झाला होता.
भाग्यश्री मोटेने आपल्या साखरपुड्याचे अनेक सुंदर-सुंदर फोटो शेअर केले आहेत. सध्या हे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत.