अभिनेता इम्रान हाश्मी फिटनेससाठी खूप जागरुक आहे. इम्रान न चुकता जिममध्ये जातो. जिममध्ये तो पूर्ण शरीराला व्यायाम देतो.
इम्रान हाश्मी योगही नियमित करतो. योग केल्यानं आपण शांत राहतो. कुठलाही तणाव सहन करू शकतो असं त्याचं म्हणणं आहे.
इम्रान हाश्मीच्या मुलाला कॅन्सर झाला. तेव्हापासून मुलाबरोबर त्यानं जंक फूड खाणं सोडून दिलं. दुसऱ्यानंही ते खाऊ नये, असा सल्ला तो देतो. द किस ऑफ लाइफ या पुस्तकात त्यानं हे शेअर केलंय.
इम्रानच्या आहारात फळं, ओट्स, चिकन, मासे, अंड्याचा पांढरा भाग, ब्रेड-बटर असतं.
इम्रान तिखट पदार्थ खात नाही. तो दिवसातून थोडं थोडं खातो. एका वेळी जास्त खात नाही.
इम्रान हाश्मी स्वत: सांगतो की तुम्ही दारूपासून दूर राहा. तो स्वत: हा नियम पाळतो.